ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 8 कोटींच्या बनावट नोटांचे घबाड जप्त

 ठाण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान दोघांकडून दोन हजार रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या नोटांचे बाजारमुल्य 8 कोटी असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.

अटक केलेले दोन्ही आरोपी पालघर येथील रहिवासी असून, अन्य आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. छापलेल्या या नोटा नेमक्या कुणाच्या सांगण्यावरुन छापण्यात आला याचा तपास पोलीस घेत असून, यातील काही नोटा बाजारात पाठवण्यात आल्या आहेत का? याचादेखील तपास पोलीस करत आहेत.

( हेही वाचा: गुजरात निवडणुकीपूर्वी 13 जिल्ह्यांत 100 हून अधिक ठिकाणी ATS ची छापेमारी )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here