Thane Crime News : इंस्टाग्रामवर सूत जुळलं, बनावट कागदपत्र वापरून थेट पाकिस्तान गाठलं; ठाण्यातील महिलेचा प्रताप

282
Thane Crime News : इंस्टाग्रामवर सूत जुळलं, बनावट कागदपत्र वापरून थेट पाकिस्तान गाठलं; ठाण्यातील महिलेचा प्रताप

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या पाकिस्तानी तरुणासोबत लग्न करण्यासाठी बनावट नावाने पासपोर्ट व्हिसा मिळवून पाकिस्तानमध्ये गेलेल्या एका महिलेसह दोन जणांविरुद्ध ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय पासपोर्ट कायदा आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संशयित महिला नोव्हेंबर महिन्यात भारतात परतली असून अद्याप तिला अटक करण्यात आली नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. ही महिला पाकिस्तानमध्ये लग्न करण्यासाठी गेली होती की दुसऱ्या कामासाठी गेली होती याबाबत तिच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून ठाणे एटीएस तसेच एनआयएकडून या प्रकरणाचा संलग्न तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Thane Crime News)

नगमा नूर मकसूद अली उर्फ ​​सनम खान असे या महिलेचे नाव आहे. नगमा ही ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा ४ येथे आई आणि लहान मुलीसोबत राहण्यास होती. कोरोनामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा हिची इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एका तरुणासोबत ओळख झाली होती. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. भारतातून पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी तिने मुलीचे आणि स्वतःचे नाव बदलून कागदपत्रे तयार करून या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि पर्यटन व्हिसा मिळवला होता. (Thane Crime News)

(हेही वाचा – राष्ट्र विकासासाठी योगदान या सकारात्मक भावनेने कर भरावा; राज्यपाल Ramesh Bais यांचे प्रतिपादन)

मे २०२३ मध्ये नगमा ही मुलीसोबत पाकिस्तानमध्ये गेली होती. तिच्या व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर नगमाने पाकिस्तान दुतावासात व्हिसाचा कालावधी वाढवून मागितला होता. परंतु, तिला कालावधी वाढवून देण्यात आला नाही, काही महिने पाकिस्तानमध्ये राहिल्यानंतर नगमा ही नोव्हेंबर महिन्यात आई आजारी असल्यामुळे भारतात परतली होती. नगमा ही पाकिस्तानला जाऊन आल्याची माहिती जुलै महिन्यात ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीत नगमाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट आणि व्हिसा बनवून पाकिस्तान दौरा केल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी नगमा आणि तिला कागदपत्रे तयार करून देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय पासपोर्ट कायदा आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही संशयित महिला नोव्हेंबर महिन्यात भारतात परत आली असून अद्याप तिला अटक करण्यात आली नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. (Thane Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.