अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टो.) रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाशी निगडित आतापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक आरोपी अद्याप फरार आहे.
(हेही वाचा-Baba Siddique Murder प्रकरणी एका आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी; दुसऱ्याचा मात्र अल्पवयीन असल्याचा दावा)
त्यापैकी एक आरोपी गुरनैल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली, तर दुसरा आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट (Ossification Test) करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून आरोपी धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap) अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं असून त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Baba Siddique)
ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय ?
ऑसिफिकेशन हा एक इंग्रजी शब्द आहे. मानवी शरिरात हाडे तयार होणे तसेच त्यांचा विकास होण्याच्या प्रक्रियेला ऑसिफिकेशन म्हटलं जातं. बाल्यावस्था ते किशोरवयापर्यंत मानवी हाडांचा विकास होत असतो. किसोरवयानंतर ही वाढ थांबवते. या काळात मानवी हाडे टणक होतात. हाडांच्या मॅट्रिक्समध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आदी घटक जमा होतात. मानवाचे वय जसे- जसे वाढते तसे-तसे हाडांचा विकास मंदावतो. परिणामी कालांतराने हाडे ठिसूळ होतात आणि हाडे तुटण्याची शक्यता वाढतो. मानवी हाडांच्या विकासाची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेऊन हाडांच्या ऑसिफिकेशननुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे वय ठरवणे शक्य होते. (Baba Siddique)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community