Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीस सात वर्षाचा मुलगा ; दत्तात्रय गाडेच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

116
Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीस सात वर्षाचा मुलगा ; दत्तात्रय गाडेच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे
Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीस सात वर्षाचा मुलगा ; दत्तात्रय गाडेच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे

स्वारगेटमधील बसमध्ये तरुणीवर बलात्कार (Swargate Bus Depot) केलेला आरोपी दत्तात्रय गाडेला (Dattatreya Gade) न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस (Pune Police) कोठडी सुनावली आहे. गाडेच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा न्यायालयात केला, तर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा (Crime News) असून, आरोपी हा सराईत आहे. घटना घडल्यानंतर आरोपीला कुणी आसरा दिला? यासह आरोपीची वैद्यकीय चाचणी व मोबाइल जप्त करायचा असल्याने आरोपीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. (Swargate Bus Depot)

चौकशीत धक्कादायक खुलासा
दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता. त्याला सात वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे सातत्याने वाद सुरू होते. त्याचा भाऊ शेती करतो. मात्र, आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. (Swargate Bus Depot)

नेमकं काय घडलं होतं ?
घटनेच्या दिवशी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला. ही माहिती आरोपीलादेखील समजली. कधीही न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला. या वेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोनच बंद करून पलायन केले. याचदरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला. (Swargate Bus Depot)

आरोपी दत्ता गाडेचे वकील काय म्हणाले ?
बलात्कार झालाचं नाही. जे झालं ते दोघांच्या संमतीने झाले. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासुन ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असं आरोपी दत्ता गाडेचे वकीलांनी सांगितले. तसेच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला. दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला. गावाला पोलीस छावणीचे रुप आल्याने तो दडून बसला, अशी माहितीही दत्ता गाडेचे वकीलांनी दिली. (Swargate Bus Depot)

सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहीजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने तरुणीला कडेंक्टर असल्याचं भासवत विश्वास संपादन केला. बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्याने भासवले. पण बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने बाहेर सोडा अशी विनंती केली. पण आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला. मारहाण करून दोन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला. (Swargate Bus Depot)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.