३५ वर्षीय प्रोबेशनरी महिला पोलीस अधिकारीचा (police woman) मृतदेह तीच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शीतल एडके असे या महिला पोलीस अधिकारी यांचे नाव आहे.
शीतल या दीड वर्षापूर्वी मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी अधिकारी (police woman) म्हणून रुजू झाल्या होत्या. तीन ते चार महिने नोकरी केल्यानंतर त्या दीर्घकाळ आजरपणाच्या सुट्टीवर होत्या अशी माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली. शीतल एडके यांचा मृत्यू आजरपणामुळे झाला असल्याची प्राथमिक श्यक्यता वर्तवली जात आहे. तर नेहरू नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
(हेही वाचा– मुंबई बेंगलोर महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी गजाआड)
शीतल एडके (police woman) या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातून असून अविवाहित होत्या. पालघर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेल्या शीतल एडके यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची विभागीय परीक्षा देऊन त्या पोलीस अधिकारी झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी त्यांची बदली मुंबईत झाली, व दीड वर्षांपूर्वी शीतल एडके नेहरू नगर पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
कुर्ला पूर्व कामगार नगर येथे एका खाजगी इमारतीत शीतल एडके यांनी भाडेतत्वावर खोली घेतली असून त्या तिथे एकट्याच राहत होत्या. बुधवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शीतल एडके यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दार तोडून आता प्रवेश केला असता शीतल एडके यांचा (police woman) मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला अशी माहिती पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली.
हेही पहा–
पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन तो पूर्व तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. शीतल एडके (police woman) यांच्या घराबाहेर दाराला २३ एप्रिल रोजीचा वृत्तपत्र आढळुम आल्यामुळे २२एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज लावण्यात आला आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
Join Our WhatsApp Community