Photo Morphing करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या माथेफिरूला तरुणीने दिला चोप

235
Photo Morphing करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या माथेफिरूला तरुणीने दिला चोप
Photo Morphing करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या माथेफिरूला तरुणीने दिला चोप
फोटो मॉर्फ (Photo Morphing) करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका माथेफिरूला तरुणीने चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. राहुल रमेश पुरोहीत (Rahul Ramesh Purohit) (२४) असे आरोपी तरुणाचे नाव असून खेरवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
वांद्रे पूर्वेकडील (Bandra East) खेरवाडी परिसरात आई, वडील आणि दोन बहिणींसोबत राहात असलेली २२ वर्षीय तक्रारदार तरुणी साकीनाका येथील एका खासगी कंपनीत ऑपरेशनल सीनीयर रिप्रेझेंटेटीव्ह पदावर नोकरी करते. इन्स्टाग्रामवर तिची एका इन्स्टाग्राम (Instagram) आयडीधारकासोबत ओळख झाली होती. ओळखीतून तरुणीने त्या आयडीवर आपला साधा फोटो पाठवला. (Photo Morphing)
काही वेळातच समोरील व्यक्तिने तोच फोटो एडीट आणि निर्वस्त्र अवस्थेत मॉर्फ करून तिला पाठवला व त्याने त्याच फोटोसोबत संदेश पाठवला. सोबतच मॉर्फ केलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. तरूणीने त्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम (Instagram) आयडीवर कॉल करून असे न करण्याची विनंती केली. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. (Photo Morphing)
घडल्याप्रकाराने घाबरलेल्या तरुणीने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. कुटुंबियांशी चर्चा करुन तरुणीने त्या व्यक्तीला १३ जुलैच्या सायंकाळी वांद्रे, कार्टर रोड येथे भेटायला बोलावले. तरुणीसोबत तिची बहीण आणि एक मित्र कार्टर रोड येथे येवून थांबले होते. तो तरुण रात्री साडेनऊ वाजता कार्टर रोड येथे भेटायला आला. येथेसुद्धा त्याने मॉर्फ फोटो सोशल मिडियावर पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. (Photo Morphing)
तरूणीने पुन्हा त्याला तसे न करण्यास विनंती केली. मात्र, तो ऐकत नसल्याने तरुणीची बहीण आणि मित्र त्यांच्याजवळ आले. त्यांनी या तरूणाला पकडले. त्यानंतर पीडित तरुणीने त्याला भररस्त्यात चोप दिला. घटनेची माहिती मिळातच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.  (Photo Morphing)
पोलिसांनी केलेल्या चौकशीत तरुणाचे नाव राहुल पुरोहीत असून तो मीरा-भाईंदरमधील रहिवासी असल्याचे उघड झाले. अखेर, पोलिसांनी पीडित तरुणीची फिर्याद नोंदवून घेत पुरोहित विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  (Photo Morphing)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.