नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून अंबड औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी दहा ते बारा जणांच्या टोळीने दोघांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मेराज खान हा अठरा वर्षाचा युवक जागीच गतप्राण झाला तर तेवीस वर्षाचा एक इब्राहिम खान हा गंभीर जखमी झाला होता त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही वेळाने त्याचे प्राणोतक्रमण झाल्याचे सांगण्यात आले.
संजीवनगर भागात एका छोट्या मुलाला काहीजण मारहाण करत होते. मेराज खान, इब्राहिम खान यांनी मारहाण करणाऱ्यांना त्याबाबत हटकले असता त्याचा राग येऊन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मेराज आणि इब्राहिम यांच्यावर हल्ला केला या दोघांना नाहक आपले प्राण गमवावे लागले. सिडको पोलिसांवर कामाचा वाढतात आणि लक्षात घेऊन अंबड औद्योगिक वसाहत परिसरात चुंचाळे पोलिस चौकी उभारण्यात आली. एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस व कर्मचारीही येथे तैनात करण्यात आले.
(हेही वाचा – NCP : आता राष्ट्रवादीचे मंत्रीही जनता दरबार घेणार)
परंतु तरीही गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे बोलले जाते. भर रस्त्याने टोळक्याने आणि हा हातात धारदार तीक्ष्ण हत्यारे घेऊन धावणाऱ्या गुंडांच्या व या हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा थरार घडत होता त्यावेळी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचीही भीतीने गाळण उडाली होती. घटनेचे वृत्त समजताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच जाब जवाब नोंदवून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. हल्लेखोर हे चुंचाळे परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेनंतर चुंचाळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community