प्रेयसीला त्रास देतो म्हणून वर्गमित्राला घरी बोलावून कोयत्याने केला हल्ला

प्रेयसीने माजी प्रियकराला पक्षी दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मालाड पश्चिम ऑरलेम चर्च परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत मालाड पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आयुष खेडेकर याला अटक केली आहे.
जयेश सावंत असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. जयेश सावंत हा जोगेश्वरी पूर्व मेघवाडी परिसरात वास्तव्यास असून, आयुष हा मालाड पश्चिम येथील ओरलेम चर्च परिसरात राहणारा आहे. दोघे ही एकाच कॉलेजात आणि एकाच वर्गात शिक्षण घेत आहे. जयेश सावंतचे वर्गातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. या तरुणीने काही आठवड्यापूर्वी जयेशसोबत असलेले संबंध तोडलेआणि तिचे आता आयुषसोबत प्रेम प्रकरण सुरू होते.

आरोपीला अटक

माझ्यासोबतचे नाते का तोडले याबाबत जयेश या तरुणीला सतत फोन विचारत होता. ही बाब तरुणीने आयुषला सांगितली. जयेश हा पक्षी प्रेमी असल्यामुळे आयुषने त्याला गुरुवारी आपल्या घरी पक्षी दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. आयुषच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आयुषने जयेश घरी येताच कोयत्याने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला, आयुषने रक्ताने माखलेले जयेशचे कपडे बदलून त्याला स्वतःच्या गाडीवर उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करून तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात धाव घेऊन जखमी जयेश याचा जबाब नोंदवून आयुषविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here