गँगस्टर Lawrence Bishnoiला मुंबईत आणण्याच्या हालचालीला वेग

167
Assembly Election : बिश्नोई टोळीच्या दहशतीमुळे यंदाच्या निवडणूक प्रचारातून बॉलिवूड सेलिब्रिटी गायब

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला (Lawrence Bishnoi) मुंबईत आणण्याच्या हालचालीला वेग आला आहे. मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी संदर्भात नवी दिल्ली येथे कागदपत्रासह भेट दिली आहे. लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) हा गँगस्टर गुजरातच्या साबरमती तुरुंगात असून लवकरच त्याला चौकशीकामी मुंबई आणले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू)

फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम २६८ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाने बिश्नोईच्या गुजरातच्या साबरमती तुरुंगातून एका वर्षासाठी बदली करण्यास मनाई केली होती. बिश्नोई हा या घटनेचा कथित सूत्रधार आहे. त्याच्या बदलीची कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने सुरू असून तो लवकरच मुंबई पोलिसांच्या ताब्यात येईल, असे सूत्रांकडून समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलीकडेच सलमान खान (Salman Khan) गोळीबार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांसह नवी दिल्लीला भेट दिली आणि राज्यातीलअधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या परतल्यानंतर, बिष्णोई यांच्या बदलीसाठी आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुंबईतील अतिरिक्त अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध)

ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले तेच अधिकारी बिश्नोई यांना मुंबईत आणू शकतील, यासाठी कागदपत्रे लवकरात लवकर पूर्ण करणे हा यामागचा उद्देश आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे, तर एका आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.