बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif ali khan) हल्ला करणार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर , मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून आरोपीला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीचे खरे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहिजाद (३३) (Mohammad Shariful Islam Shahizad) आहे. त्याने विजय दास (Vijay Das) या नावाचा वापर केला असल्याची माहिती समोर येत आहे. (Saif ali khan)
हेही वाचा-Saif Ali Khan हल्ला प्रकरण-छत्तीसगड मधून एक जण ताब्यात
रात्री उशिरा केलेल्या कारवाईत ठाण्यातील हिरानंदानी येथील मेट्रो बांधकाम साइटजवळील लेबर कॅम्प येथून आरोपीला अटक करण्यात आली. तो यापूर्वी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. पोलिसांनी त्याचा माग काढला तो हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकाम स्थळी गेला होता, जिथे तो दाट झाडीत लपला होता. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याला पकडण्यात आले आणि वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला उद्या (20 जाने.) न्यायालयात हजर केले जाईल, जिथे पोलिस कोठडी मागतील. अटकेमुळे या हल्लाचे नक्की कारण समोर येईल. (Saif ali khan)
हेही वाचा-Congress खासदाराने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन केला महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
या कारवाईनंतर आज (19 जाने.) सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत. दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलीस ज्या प्रश्नांचा शोध घेत होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. सैफ अली खानच्या घरात आरोपी कसा घुसला? आरोपींचा हेतू काय होता? या कामात त्याला साथ देणारा दुसरा कोणी आहे का? त्याने आणखी किती बॉलिवूड कलाकारांच्या घराची रेकी केली आहे? सैफच्या घरी जाण्याचा त्याचा उद्देश काय होता? त्याला कोणाला टार्गेट करायचा होते? ज्यांच्या मदतीने आरोपी सैफच्या घरी पोहोचला तो कोण आहे? असे अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. आज पोलीस चौकशीदरम्यान याप्रकरणाची उत्तर शोधणार आहेत. (Saif ali khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community