मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उडविण्याचा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याला केरळ मधून अटक करण्यात आली आहे. फेबिन शहा (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून मुंबई एटीएसने त्याला अटक केली आहे. मात्र त्याने धमकी कशासाठी दिली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Mumbai AirPort)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत ईमेल वर गुरुवारी एका व्यक्तीने ईमेल करून धमकी दिली होती. इंग्रजी भाषेत आलेल्या ईमेल मध्ये लिहण्यात आले होते की, “तुमच्या विमानतळावर ही शेवटची सकाळ आहे. टर्मिनल २ वर ४८ तासांच्या आत मोठा स्फोट होईल. दिलेल्या पत्त्यावर बिटकॉइनच्या रूपात एक दशलक्ष डॉलर्स द्या.” असा धमकीचा मेल पाठविण्यात आला होता व मेल आयडी वर पत्ताही देण्यात आला होता. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Mumbai AirPort)
(हेही वाचा – Abhyudaya Bank : आरबीआयने अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ हटवले; प्रशासकाची नियुक्ती)
या गुन्ह्याचा संलग्न तपास मुंबई एटीएस आणि इतर तपास यंत्रणा करीत होती, मुंबई एटीएसच्या पथकाने मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला सदर धमकीचा मेल केरळ राज्यातून आला असल्याचे निष्पन्न झाले. एटीएसच्या पथकाने शुक्रवारी केरळ येथून मेल करणाऱ्या फेबिन शहा (२२) ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सहार पोलिसानी आरोपीला अटक करून अधिक तपास सुरू केला आहे. (Mumbai AirPort)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community