Mumbai Police : अधिवेशनाच्या काळात मुंबईतील डझनभर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना धमकी देणारा अखेर अटकेत

129

विधानसभा अधिवेशनाच्या काळात मुंबईतील सुमारे डझनभर ‘सिनियर पीआय’ना अडचणीत आणण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या एका पोलीस खबऱ्याला कानपूर येथून खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. जयेश सावंत (३९) असे अटक करण्यात आलेल्या कथित खबऱ्याचे नाव आहे. मुंबईतील वर्सोवा येथे रहाणारा जयेश सावंत हा एकेकाळी मुंबई पोलिस दलातील पोलीस अधिकारी यांचा खबरी म्हणून काम करीत होता, अशी माहिती एका अधिकारी यांनी दिली आहे.

जयेश सावंत हा मागील काही वर्षापासून कुटुंबियांसह कानपूर येथे राहण्यास असला तरी मुंबईत त्याचे नेहमी जाणे येणे असते. राज्यात विधानसभा अधिवेशन सुरु झाल्यानंतर सावंत याने मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या बेकायदेशीर धंद्याचे तसेच डान्स बारचे व्हिडीओ शूट करून संबंधित पोलीस ठाण्यातील ‘सिनियर पोलीस इन्स्पेक्टर’  (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांना त्याच्या व्हाट्सअप वर बेकायदेशीर धंद्याचे व्हिडीओ पाठवत असे, त्यानंतर त्यांना एका वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगून हे व्हिडीओ  प्रसारित  करून अडचणीत आणण्याची धमकी देऊन त्याच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करीत होता.

मागील काही महिन्याभरात त्याने पूर्व आणि पश्चिम उपनगतील डझनभर पोलीस ठाण्याच्या सिनियर पीआय यांना फोन करून खंडणीची मागणी केली होती. ऐन अधिवेशनाच्या काळात अडचणीत आणणारे कॉल आल्यामुळे अनेक सिनियर पीआयचे धाबे दणाणले होते. अनेक सिनियर पीआयने ओळखीच्या पत्रकारांना फोन करून जयेश सावंत हा खरोखर वृतवाहिनीचा संपादक किंवा पत्रकार आहे का याची खात्री करण्यास सुरुवात केली होती, जयेश सावंत हा कोणी पत्रकार किंवा संपादक नाही असे लक्षात आल्यानंतर अखेर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विलेपार्ले  आणि भांडुप पोलीस ठाण्यात अखेर खंडणीचा गुन्हा दाखल करून जयेश सावंत याचा शोध सुरु केला. सावंत हा कानपूर शहरातील कल्याणपूर परिसरात राहत  असल्याची  माहिती  विलेपार्ले आणि भांडुप पोलिसांना मिळाली. दोन्ही पोलीस ठाण्याचे पथक कानपूरला रवाना झाले आणि कानपुर मधून त्याला ताब्यात घेऊन मुंबईत आणून विलेपार्ले पोलिसांनी त्याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. जयेश सावंत याची विलेपार्ले पोलिस ठाण्यातील कोठडी संपताच  भांडुप  पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन त्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असल्याची  माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडांगळे यांनी दिली.

(हेही वाचा Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने तिरंगा फडकवण्यात मुसलमानांमध्ये लागली चढाओढ)

पोलीस सूत्राच्या म्हणण्यानुसार भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांना २० जुलै रोजी प्रथम फोन आला. “कॉलरने दावा केला होता की, तो एका राष्ट्रीय वृतवाहिनीचा मुख्य संपादक आहे आणि त्याला  त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही बेकायदेशीर गोष्टींची माहिती असल्याचा दावा त्याने केला होता. त्यानंतर सावंत यांनी त्यांना  एका ऑर्केस्ट्रा बारचा व्हिडिओ पाठवला जो परवानगीच्या तासांनंतरही सुरू बेकायदेशीररित्या सुरु होता. नंतर त्याने तो व्हिडीओ आपल्या  वृत्तवाहिनीवर चालवण्याची धमकी दिली आणि त्या नावाखाली त्याने खंडागळे यांच्याकडे पैशांची मागणी केली.पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी खंडागळे यांच्याकडे सुरुवातीला १ लाख रुपयांची मागणी केली आणि पोलिस अधिकाऱ्याला अशा प्रकरणांची माहिती असल्याने त्यांनी औपचारिक म्हणून  तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सावंत याच्या संपर्कात राहून त्याला अटक करण्याची योजना  पोलिसांनी आखली  “सुरुवातीला १ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर ३० हजार रुपयात सौदा पक्का करण्यात आला. त्याचवेळी विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पथक देखील त्याच्या मागावर होते, भांडुप आणि पार्ले पोलीस ठाण्याच्या पथकांना जयेश सावंत याचे लोकेशन कानपूर येथे मिळाले आणि आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

२३ जुलै रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सावंत यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून ४५ हजार रुपये उकळले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयेश  सावंत यांचे लग्न कानपूरमधील ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाऱ्या महिलेशी झाले आहे. त्याला आरोग्याच्या काही समस्या असल्याने आणि त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी पॆसे उभे करण्यासाठी त्याने पोलिस अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा निर्णय घेतला होता. जयेश हा पोलीस खबरी देखील होता, त्याला पोलिसांचे काम कसे चालते  याबाबत पूर्वकल्पना असल्यामुळे त्याने एबधे मोठे धाडस केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.