Salman Khan ला धमकी देणारा निघाला मनोरुग्ण; वडोदरा येथून घेण्यात आले ताब्यात

99
Salman Khan ला धमकी देणारा निघाला मनोरुग्ण; वडोदरा येथून घेण्यात आले ताब्यात
  • प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे ठार मारण्याची धमकीचा मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवणाऱ्याला वडोदरा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मयांक पंड्या असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयांक पंड्या हा मनोरुग्ण असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. वरळी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनला रविवारी एक व्हॉट्सअॅप संदेश मिळाला ज्यामध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला घरात घुसून त्याला ठार मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

(हेही वाचा – मुंबईत पहिली Vedic School सुरु; मुलांची आध्यात्मिक विकासासह शैक्षणिक प्रगती होणार)

वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मेसेज पाठवणाऱ्याची २४ तासात ओळख पटवली. मयंक पांड्या (२५) हा गुजरातमधील वडोदरा येथील राहणारा आहे. “तांत्रिक माहितीचा वापर करून, आम्ही पांड्याला त्याच्या वडोदरा येथील निवासस्थानी शोधून काढले. तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याने, आम्ही त्याला नोटीस बजावली आहे आणि त्याला तपासात सहकार्य करण्यासाठी सांगितले आहे,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, हिंदीमध्ये लिहिलेला हा धमकीचा संदेश रविवारी सकाळी ६.२७ ते ६.२९ च्या दरम्यान पाठवण्यात आला. (Salman Khan)

(हेही वाचा – Ambedkar Jayanti 2025 : डॉ. आंबेडकरांचे कार्य सामाजिक समरसतेचे; भाजपाच्या अर्चना वानखेडे यांचे प्रतिपादन)

चौकशीदरम्यान, पांड्याने सांगितले की तो अलीकडेच एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील झाला होता जिथे त्याला लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमानला लक्ष्य करत असल्याचे कळले, असे अधिकाऱ्याने सांगितले. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या नेतृत्वाखाली वरळी पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. राजस्थानमध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान १९९८ मध्ये झालेल्या काळवीट हत्या प्रकरणात सलमानचा सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या तीन वर्षांत सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या मिळाल्या आहेत. (Salman Khan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.