छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

240
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अनेक सर्वसान्य नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “मी तुमच्या नावाची सुपारी घेतली असून उद्याच तुमचं बरं वाईट करणार आहे” अशी धमकी देणारा एक फोन कॉल छगन भुजबळ यांच्या सहायकाच्या मोबाईलवर आला होता. सोमवारी (१० जुलै) रात्रीच्या सुमारास ही धमकी देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत महाड येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान त्या तरुणाने नशेत हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.

(हेही वाचा – कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर होणार सुनवाई)

सोमवारी (१० जुलै) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास भुजबळ कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे.

सोमवारी मंत्री छगन भुजबळ पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. संध्याकाळचा कार्यक्रम सुरू असताना त्यांना धमकीचा फोन आला. खरंतर हा फोन छगन भुजबळांच्या मोबाईलवरच करण्यात आला होता. त्यांचा मोबाईल त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर डायवर्ट करण्यात आलेला होता. भुजबळ कार्यक्रमात असल्यामुळे तो फोन त्यांचा कार्यकर्त्या संतोष गायकवाड यांनी उचलला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.