पुण्यातील लोणकरच्या डेअरीत आखली Baba Siddiqui यांच्या हत्येची योजना 

332
पुण्यातील लोणकरच्या डेअरीत आखली Baba Siddiqui यांच्या हत्येची योजना 
पुण्यातील लोणकरच्या डेअरीत आखली Baba Siddiqui यांच्या हत्येची योजना 

माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येची योजना पुण्यात आखण्यात आली होती. यासाठी हल्लेखोर आणि लोणकर बंधू यांच्या दूध डेअरीत अनेक बैठका पार पडल्या, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पुण्यातून प्रवीण लोणकर (Praveen Lonkar) याला अटक केली असून शुभु लोणकर (Shubhu Lonkar) फरार झाला आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात ही तिसरी अटक असून हल्लेखोरांपैकी शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Baba Siddiqui)

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लोणकर यांची पुण्यात एक डेअरी आहे. जिथे बाबा सिद्दीकीच्या (Baba Siddique murder plan in pune) हत्येची योजना आखण्यात आली होती. या डेअरीमध्ये गुरमेल सिंग, शिवकुमार गौतम, धर्मराज कश्यप, मोहम्मद जीशान अख्तर, प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांनी हत्येची योजना आखण्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. तसेच शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप हे पुण्यातील लोणकर यांच्या डेअरीजवळील भंगाराच्या दुकानात काम करायचे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. हा गुन्हा करण्यासाठी लोणकर बंधूंनी गौतम आणि कश्यपला भरती केल्याचा आरोप आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फरार झिशान अख्तर याने तिन्ही शूटर्सची या कामासाठी नेमणूक  केल्याचा संशय आहे. ७ जून रोजी तुरुंगातून सुटल्यानंतर अख्तरने गुरमेल सिंग यांची भेट घेतली होती.

(हेही वाचा – चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अभिनेते Atul Parchure यांच्या निधनानंतर CM Eknath Shinde यांनी वाहिली श्रद्धाजंली)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवीण लोणकरने सिद्दीकीच्या हत्येतील आरोपींना केवळ शस्त्रे आणि रोख रक्कमच दिली नाही तर रसदही पुरवली. शूटर्स यांना ५० ते ६० हजार रुपये ऍडव्हान्स देण्यात आले होते, हत्येनंतर त्यांना मोठ्या रकमेचे आश्वासन देण्यात आले होते. (Baba Siddiqui)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.