आणखी एक हत्याकांड: दिल्लीत एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरली आहे. दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागात एकाच घरात पोलिसांना चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका मुलाने आपले आई- वडील, बहीण आणि आजीची हत्या केल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी रात्री साधारण साडेदहा वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे.

आरोपी मुलगा व्यसनाधीन असून तो सतत अंमली पदार्थांचे व्यसन करायचा. तसेच, नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचीही माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख पटवली आहे. केशव असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 25 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही.

( हेही वाचा: Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ‘ती’ भीती ठरली खरी )

मृत व्यक्तींची नावे

  • आरोपीचे वडील 42 वर्षीय दिनेश कुमार
  • आरोपीची आजी दीवानो देवी
  • आरोपीची आई दर्शन सैनी ( वय-40)
  • आरोपीची बहीण उर्वशी (वय-22)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here