ठाणे रेव्ह पार्टी प्रकरणात (Thane Rave Party Case) अटक करण्यात आलेल्या दोन आयोजकांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांना न्यायालयाने ४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पार्टीसाठी (Rave Party) दोन वेळा जागा उपलब्ध करून देणारा जागेचा मालक गणेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (Rave Party)
ठाणे गुन्हे शाखेने घोडबंदर रोडवरील कासारवडवली (Kasarvadavali) खाडी किनारी रविवारी पहाटे ३ वाजता रेव्ह पार्टीवर (Rave Party) छापा टाकून ९५ तरुणांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ (Drugs) आणि मद्याचा साठा जप्त करण्यात आला होता. गुन्हे शाखा घटक ५ ने याप्रकरणी दोन आयोजकांवर कासारवडवली (Kasarvadavali) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आयोजकांना अटक करण्यात आली होती. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची वैद्यकीय चाचणी (Medical test) करून त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या तरुणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. (Rave Party)
(हेही वाचा – Ram Mandir: २२ जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, ‘या’ संस्थेने पत्राद्वारे केली पंतप्रधानांना विनंती)
सोशल मीडियावर रेव्ह पार्टीचे आयोजन
अटक करण्यात आलेल्या आयोजकापैकी एक जण डोंबिवली पलावा आणि दुसरा कळवा येथे राहणारे असून या दोघांनी या रेव्ह पार्टीचे (Rave Party) आयोजन सोशल मीडियावर केले होते. या पार्टीसाठी कासारवडवली (Kasarvadavali) येथील खाडी किनाऱ्यावर असलेली जागा निश्चित करण्यात आली होती, या जागेवर दुसऱ्यांदा रेव्ह पार्टीचे (Rave Party) आयोजन करण्यात आले होते, या पूर्वी देखील या ठिकाणी रेव्ह पार्टी (Rave Party) करण्यात आली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. पार्टीसाठी असलेली जागा ही गणेश राऊत नावाच्या व्यक्तीची असून त्याने दुसऱ्यांदा जागेचे भाडे घेऊन ही जागा पार्टीसाठी दिली होती, गणेश राऊत यांच्याकडे देखील चौकशी सुरू असून या प्रकरणात त्याला देखील अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Rave Party)
आयोजकांनी सोशल मीडियावर गोवा, राज्यातील विविध ठिकाणे असे एकूण चार ते पाच रेव्ह पार्टीचे (Rave Party) आयोजन यापूर्वी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. शनिवारी झालेल्या रेव्ह पार्टीत (Rave Party) सहभागी झालेले तरुण हे मुंबई, पालघर, मिरारोड, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबई येथून आले होते. त्यापैकी अनेकांनी अमली पदार्थाची (Drugs) नशा केली होती, तर अनेक जण मद्याच्या नशेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कासारवडवली (Kasarvadavali) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच ठिकाणी दोन वेळा रेव्ह पार्टीचे (Rave Party) आयोजन होऊन देखील कासारवडवली पोलिसांना याची जराशीही कल्पना कशी काय नव्हती असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. (Rave Party)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community