लाखो रुपयांची रोकड घेऊन पळून गेलेल्या रिक्षाचालकाला कुर्ला पोलिसांनी काही तासांतच अंधेरी येथून अटक केली आहे. पोलिसांनी या रिक्षाचालकाकडून चोरलेली ६६ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली रोकड एका कुरियर कंपनीची असून ती रोकड मुंबईतील एका बड्या हॉटेलमध्ये पोहचविण्याची जबाबदारी नोकराला दिली होती. मोहम्मद अय्याज खुतूबद्दीन खान (५०) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून तो अंधेरी पश्चिम जुहू गल्ली येथे राहणारा आहे. (Crime)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असणाऱ्या इंद्रपुरी सर्व्हिस कुरियर या अंगाडीया कंपनीचा नोकर सुनील बारकू फिरके हे भुसावळ येथून कंपनीचे एक पार्सल घेऊन ११ मे रोजी मुंबईत कुर्ला येथे आले होते. हे पार्सल त्यांना ग्रँड हयात हॉटेल येथे एकाकडे पोहचवायचे होते. सुनील यांनी कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम येथून रिक्षा पकडली व हॉटेल शोधत होते, परंतु त्यांना हॉटेल मिळून येत नसल्यामुळे रिक्षाचालकाने चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड बाबा पराठा सिक कबाब कुर्ला येथे रिक्षा थांबवून पत्ता विचारायला सांगितले. सुनील फिरके हे पार्सल असलेली बॅग रिक्षात ठेवून हॉटेलचा पत्ता विचारायला गेला असता, रिक्षा चालकाने पार्सलची बॅग घेऊन रिक्षासह पोबारा केला. या पार्सलमध्ये ६६ लाख ८५ हजार रुपयांची रोकड होती, ही रोकड हॉटेल ग्रँड हयात येथे एकाला देण्यात येणार होती अशी माहिती तक्रारदार याने कुर्ला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Crime)
(हेही वाचा – Urban Voters : शहरी मतदारांना मतदानासाठी उतरविण्याचे राजकीय पक्षांसमोर आव्हान)
कुर्ला पोलीस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाने पो.उप.नि ज्ञानेश्वर निमजकर व पथकाने कुर्ला, सांताक्रूझ आणि अंधेरी परिसरातील जवळपास ४० सीसीटीव्ही तपासून रिक्षाचा माग काढण्यात आला असता रिक्षा मालकाने ही रिक्षा जुहू गल्लीत राहणारा मोहम्मद अय्याज खुतूबद्दीन खान याला शिफ्टवर चालविण्यासाठी दिल्याचे रिक्षाच्या मुळ मालकाने सांगितले. कुर्ला पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकाने रिक्षाचालक मोहम्मद याचा शोध घेऊन अंधेरी येथून त्याला अटक करू नये त्याच्या जवळील ६६ लाख ८५ हजार रुपयांचे पार्सल ताब्यात घेण्यात आले अशी माहिती वपोनि. खोत यांनी दिली. याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community