पोलीस शिपायाच्या Suicide ने उघड झाले पोलीस ठाण्यातील सत्य

259
पोलीस शिपायाच्या Suicide ने उघड झाले पोलीस ठाण्यातील सत्य
  • प्रतिनिधी 

गोरेगाव पूर्व नागरी निवारा संकुल येथे राहणाऱ्या एका पोलीस शिपायाने सोमवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. मात्र या आत्महत्येमुळे पोलीस ठाण्यात सुरू असलेला बदली आणि पोस्टिंगचा वाद समोर आला आहे. या वादाचा किंवा वरिष्ठांना करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचा आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचा संबंध नसला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाच्या नावाने जाणून-बुजून हा अर्ज करण्यात आल्याचा दावा मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाने केला आहे.

मालाड पूर्वेतील कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी बदली होऊन आलेले पोलीस शिपाई सुभाष कांगणे (३७) यांनी सोमवारी घरात कोणीही नसताना गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. कांगणे यांच्या आत्महत्येमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. सुभाष कांगणे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हाती लागली आणि त्यात धक्कादायक अशी माहिती समोर आली. पोलीस शिपाई कांगणे यांनी सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की, ६ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या नावाने कोणीतरी खोटा तक्रार अर्ज परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला होता.

(हेही वाचा – विरोधी पक्षनेतेपदासाठी उबाठा गटाकडून Bhaskar Jadhav यांच्या नावाचा प्रस्ताव)

हा अर्ज कुरार पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस उपायुक्त यांना पाठवला असल्याचा संशय कांगणे यांनी सुसाईड (Suicide) नोटमध्ये व्यक्त केला आहे. या संशयित सपोउनि यांच्या नावाचा उल्लेख देखील कांगणे यांनी केला आहे. हा अर्ज पाठवला तेव्हा पासून सुभाष कांगणे हे मानसिक तणावात होते असे कांगणे यांनी म्हटले आहे. तक्रार अर्जात पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदाराच्या काही महत्त्वाच्या पोस्टिंग संदर्भात उल्लेख करून या पोस्टिंग कशा प्रकारे दिल्या जातात, आणि या पोस्टिंग वरील अंमलदारांचे नेमके काम काय असते हे उघड करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुली आणि भ्रष्टाचार संदर्भात या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

उपायुक्तांना पाठवलेल्या तक्रार अर्जात काय म्हटले?

पोलीस ठाण्यातील ५२ लोकांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यातील काही लोकांना सोडण्यात आले परंतू सिनियर ऑडरली, मिल स्पेशल आणि बीट ऑडर्ली यांची बदली सर्वसाधारण बदली २०२४ मध्ये झालेली आहे. वरील सर्व असे काय महत्त्वाचे काम करतात की त्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही आणि या लोकांची मक्तेदारी का? याचेकारण भ्रष्ट व्यवस्था वरील सर्व वरिष्ठ पोलीस निरिक्षक व इतर अधिकाऱ्यांना भ्रष्ट मार्गाने पैसा आणून देतात त्यांचे वसूलीचे काम करतात हे जर खोटे असेल तर त्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून हटवून इतरत्र नोकरी दिल्यास तुमच्या लगेच निदर्शनास येईल. त्याच बरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध वाईट आणि भ्रष्टाचाराचे आरोप या तक्रार अर्जात करण्यात आले आहे. (Suicide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.