चंद्रपूर (Chandrapur) येथील दाताळा मार्गावरील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) शनिवार, ११ जानेवारीच्या रात्री १ वाजताच्या सुमारास बंदुकधारी सात जणांनी दरोडा घातला. मंदिरात असलेल्या चौकीदाराचे हात-पाय बांधून आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत बंद केले. दानपेटी फोडून लाखोची रक्कम लंपास केली. या प्रकरणी रविवार, १२ जानेवारीला सकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
(हेही वाचा – BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)
दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करताच सीसीटीव्हीवर कापड टाकले. त्यामुळे कोणताही चोरटा त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नाही. चौकीदारांकडील तीन हजार रुपये, तसेच त्याने कुणाला संपर्क करू नये, म्हणून मोबाईलही चोरट्यांनी पळविला.
दाताळा मार्गावर ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर (theft in temple) आहे. ११ जानेवारीच्या रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. गाभाऱ्यात पाहणी करुन तो निघून गेला. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता सात सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. दानपेटी फोडल्यानंतर सातही चोरट्यांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे, तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले. (Chandrapur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community