Jewelry Missing : काळबादेवीतील २५० वर्षे जुन्या विठ्ठल रखुमाई मंदिरातील साडे तेरा लाखाचे दागिने गायब 

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील विठ्ठल वाडी या ठिकाणी २५० वर्षे पुरातन विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे.

136
Jewelry Missing : काळबादेवीतील २५० वर्षे जुन्या विठ्ठल रखुमाई मंदिरातील साडे तेरा लाखाचे दागिने गायब 
Jewelry Missing : काळबादेवीतील २५० वर्षे जुन्या विठ्ठल रखुमाई मंदिरातील साडे तेरा लाखाचे दागिने गायब 
दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेले २५० वर्षे पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिराच्या तिजोरीतील गायब झालेल्या १३ लाख रुपये किमतीच्या दागिन्या प्रकरणी तब्बल पाच वर्षांनी अज्ञात ट्रस्टी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी का लागला याबाबत माहिती घेण्यात आली असता लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी हिंदुस्थान पोस्टला माहिती देताना सांगितले की, २०१८ मध्ये आमच्याकडे मंदिर विश्वस्ताकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
या तक्रार अर्जाचा तपास करणारे अधिकारी हयात नसल्यामुळे २०२३ मध्ये मंदिर विश्वस्त यांनी नव्याने तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जावरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे अशी माहिती वाघ यांनी दिली. दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील विठ्ठल वाडी या ठिकाणी २५० वर्षे पुरातन विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. १९५३ साली मंदिर संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा पासून प्रत्येक वेळी या संस्थेवर ७ विश्वस्तांची नेमणूक करण्यात येत होती. २०१० पासून शरयू कापडिया हे या संस्थेच्या व्यवस्थापक म्हणून मंदिराचे काम बघतात.
मंदिरात असलेल्या तिजोरी मध्ये देवाचे सोने चांदीचे असे एकूण १३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे (सध्याचा बाजारभाव) दागिने ठेवण्यात आले होते. १९९२ ते १९९७ दरम्यान असलेल्या विश्वस्त यांचे निधन झाल्यानंतर १९९२ ते २०१८ पर्यंत मंदिरात असलेली देवाचे दागिने असलेली तिजोरी उघडण्यात आलेली नव्हती. २०१८ मध्ये मंदिरांची तिजोरी उघडण्यात आली असता त्यात देवाचे दागिने मिळाले नाही. त्यात एकही दागिने नसल्यामुळे याप्रकरणी २०१८ मध्ये लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
मात्र, पोलिसांकडून  मागील पाच वर्षात या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. पाच वर्षांनी या संस्थेकडून अर्जाचा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू केली असता, २०१८ साली या अर्जाचा तपास करणारे पोलीस अधिकरी हे सध्या हयात नसून तसेच पाच वर्षात अनेक अधिकारी यांची बदली झाल्यामुळे या अर्जाचे काय झाले हे कळू शकले नाही. सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघ यांनी नव्याने अर्ज मागवुन या तक्रार अर्जाचा तपास करून अज्ञात विश्वस्त यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे प्रकरण १९९२ ते २०१८ या कालावधीतील असल्यामुळे तसेच त्यावेळी मंदिर ट्रस्टवर असलेले विश्वस्त हयात नसल्यामुळे गुन्ह्याचा सखोल तपास करावा लागेल त्यानंतरच या दागिन्यांचा अपहार कोणी केला हे कळू शकेल अशी माहिती वाघ यांनी हिंदुस्थान पोस्टला दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.