Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत ‘थुंक जिहाद’, पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ

146
Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत 'थुंक जिहाद', पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ
Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत 'थुंक जिहाद', पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ

उत्तरखंड राज्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे मसूरी. मात्र याच मसूरीमध्ये पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असून थूंक जिहादचे (Thook Jihad) प्रकरण उघडकीस आले आहे. तेथील एक चहा विक्रेता चहामध्ये थुंकून (Thook Jihad) लोकांना चहा देत असल्याचे आढळले आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसानी दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा : Shree Siddhivinayak Ganapati Mandir: श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी आता भगवा टिळा लागणार!

याप्रकरणी एका व्यक्तीने मसूरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, देहराडून येथे राहणाऱ्या हिमांशु बिश्नोई यांनी मसूरी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मसूरी लायब्ररी चौक येथे सकाळ काही विक्रेते चहा, मॅगी नाष्टा यांची विक्री करत होते. त्यातील एका दुकानदाराकडे हिमांशु (Himanshu) यांनी चहा मागितल्यावर विक्रेता चहात थुंकत (Thook Jihad) असल्याचे निदर्शनास आले. हिमांशु यांनी आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यात टीपत असताना हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यानंतर हिमांशुने दोन्ही विक्रेत्यांना अडवले असता त्यांनी हिमांशु यांना शिव्या द्याला सुरुवात केली. तसेच हिमांशु यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ज्यामुळे हिमांशु यांनी पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान मसूरी पोलिसांनी सांगितले की, चहा विक्रेत्यांची नावे नौशाद (Naushad) आणि हसन अली (Hasan Ali) असे आहे. नौशाद उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरच्या खतौलीजवळील जमशेर कॉलनीत राहतो. तर हसन अली मसूरीच्या गड्डी खाना किताबघरचा रहिवाशी आहे. तक्रारीनंतर या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाले आहेत. परंतु आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.