-
प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी बुलढाणा येथून अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत धक्कादायक कारण समोर आले असून मित्राला अडकविण्यासाठी एकाने धमकीचे ई-मेल केले होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे आहे. मंगेश वायळ आणि अभय शिंगणे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे राहणारे आहेत. (Threat Mail)
(हेही वाचा – Fire : विमानतळावरील फेअरमाँट हॉटेलमध्ये आग; ८० नागरिकांची सुखरूप सुटका)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाहनासह ‘बॉम्ब’ ने उडविण्याचे धमकीचे ई-मेल मुंबईतील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालय येथे पाठविण्यात आले होते. या धमकीच्या ई-मेलमुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई गुन्हे आणि सायबर सेलने ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस चेक केला असता हा आयपी अॅड्रेस बुलढाणा येथील देऊळगाव येथील मंगेश वायळ यांच्या मोबाईल फोनवरून मेल पाठविण्यात आल्याचे समोर आल्यावर मुंबई गुन्हे शाखेने मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना ताब्यात घेऊन मुंबईत आणून अटक करण्यात आली आहे. (Threat Mail)
(हेही वाचा – BMC : मुंबईत हातगाड्यांवर व्यवसाय करण्यास बंदी; तरीही रस्ते अडवून राहतात उभ्या)
मंगेश आणि अभय दोघे मित्र असून अभयच्या मैत्रिणीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. या मृत्यूला घेऊन मंगेश हा अभयला सतत टॉर्चर करीत होता. अखेर मंगेशला मोठ्या प्रकरणात अडकविण्यासाठी अभयने योजना आखली. त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला त्याच्यासह बॉम्बने उडविण्याची धमकीचा ई-मेल तयार करून तो मेल मंगेश याच्या मोबाईल फोन मधील ई-मेल वरून मुंबईतील विविध पोलीस ठाणे आणि मंत्रालयाच्या मेल आयडी वर पाठवून दिला होता. (Threat Mail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community