मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) आलेल्या एका मेलवर ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी व्यक्ती स्वतःला तालिबानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत आहे. या धमकीच्या मेलनंतर मुंबईसह राज्य पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या अधिकृत ई-मेल वर नुकताच एक मेल प्राप्त झाला आहे. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला तालिबानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे.
( हेही वाचा: ‘सांगा अदानीला किती कर्ज दिले?’; RBIचे बँकांना आदेश )
पोलीस यंत्रणा सतर्क
या धमकीच्या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून, मुंबईसह राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलीसांसह राज्यातील विविध तपास यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मेलची सत्यता तपासण्यात येत असून, हा मेल कुठून आला, कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे. मुंबई पोलीस तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून हा तपास सुरू आहे. या धमकीच्या मेलनंतर मुंबईच्या नाकाबंदीत वाढ करण्यात आली आहे तर, रेल्वे स्थानके, मॉल येथे तसेच, गर्दीच्या ठिकाणे आणि सागरी किनाऱ्यावरील सुरक्षादेखील वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community