Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी

60
Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी
Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता मुंबईतील (Mumbai) मंत्रालयात असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयावर (Maharashtra CMO) हल्ला करण्याची धमकी (Threat to attack) देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअँपवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Maharashtra CMO)

हेही वाचा-Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली

या प्रकरणात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअॅपवर हा धमकीचा मेसेज आला होता. हा मेसेज आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Maharashtra CMO)

हेही वाचा- महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?

धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं सांगितलं आहे. लवकरच या व्यक्तीला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्र्यांना बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. लवकरच धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra CMO)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.