Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; तपास सुरू

82
Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; तपास सुरू
Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; तपास सुरू

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Threat ) देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने (bomb) उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना (Goregaon Police) ईमेल (Email) द्वारे पाठवण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात आणि मंत्रालयात धमकीचे ई-मेल आले आहेत. (Eknath Shinde)

हेही वाचा-IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर ? फोटो व्हायरल

पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने या मेलचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून Rekha Gupta यांनी घेतली शपथ

एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीत आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी हे नेते दिल्ली दौऱ्यावरती आहेत. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.