RBI Mumbai Bomb Threat : थेट आरबीआय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेतील मेलची चौकशी सुरू

33
RBI Mumbai Bomb Threat : थेट आरबीआय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आलेल्या मेलबाबत चौकशी सुरू
RBI Mumbai Bomb Threat : थेट आरबीआय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आलेल्या मेलबाबत चौकशी सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला आहे. रशियन भाषेत लिहिलेल्या ईमेलमध्ये सेंट्रल बँक उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. या प्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विविध स्तरावर तपास सुरू केला आहे. (RBI Mumbai Bomb Threat)

(हेही वाचा – छळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणता येणार नाही: Supreme Court चे महत्त्वाचे निर्देश)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी आरबीआयला आलेल्या धमकीच्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय असेल, याचा शोध घेतला जात आहे. मेलचा आयपी ॲड्रेसही तपासला जात असून, त्यासाठी गुन्हे शाखा आणि सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.

आरबीआयला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आरबीआयला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. (RBI Mumbai Bomb Threat)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.