Reserve Bank of India ला धमकीचा फोन, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

132
Dormant Bank Accounts : देशातील निद्रिस्त बँक खात्यांमध्ये १ लाख कोटी रुपये पडून

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India)च्या कस्टमर केअर (Customer Care) विभागाला धमकीचा फोन आला आहे. शनिवारी (१६ नोव्हें.) सकाळी १० च्या सुमारास कस्टमर केअरला हा फोन करण्यात आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) सीईओ असल्याचं सांगितलं आहे. तसेच मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असं म्हणत त्याने फोन ठेवला.

(हेही वाचा-Amit Shah यांच्या सर्व सभा रद्द! तातडीने दिल्लीला रवाना; कारण आलं समोर)

यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बॅंकेच्या सुरक्षा रक्षकाला जाऊन तपासणी करण्यास सांगितले. मात्र, त्याठिकाणी अशी कोणतीही गाडी आढळून आलेली नाही. या घटनेची गांर्भियाने दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank of India) आलेला फोन नेमका कुठून आला, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा इलेक्ट्रिक कार खराब झाल्याचे म्हणून शेवटी फोन ठेवला.

(हेही वाचा-Navneet Rana यांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल)

इंडियन एअरलाइन्सला सतत अशाप्रकारचे फोन येत होते. यामुळे अनेक उड्डाण घेतलेल्या विमानांची लॅडिंग करावे लागत होते. सततच्या धमक्यांनी विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) एअरलाइनला येणाऱ्या धमकीच्या कॉल्सचा तपास करत आहे. NIA सायबर विंग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. (Reserve Bank of India)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.