Threatening Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला ‘X’वर पोस्ट लिहून धमकी, तरुणाला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

मुंबई पोलिसांनी 'X'वर ही पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

180
Eknath Shinde: एनडी नेतेपदी मोदींच्या निवडीला शिवसेनेचा पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदे अनुमोदन देत म्हणाले...
Eknath Shinde: एनडी नेतेपदी मोदींच्या निवडीला शिवसेनेचा पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदे अनुमोदन देत म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’च्या माध्यमातून धमकावणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. आरोपी शुभम वरकड हा मूळचा नांदेडचा असून तो पुण्यात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्सचे (बीसीए) शिक्षण घेत आहे. (Threatening Eknath Shinde)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय नावाच्या व्यक्तिने ११ फेब्रुवारीला सोशल मिडिया ‘X’वर एक पोस्ट लिहून म्हटले होते की, ‘मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे. मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे थोडासा अनुभव आहे, गुंड मला मार्गदर्शन करू शकतात. या पोस्टला वरकडने स्वत:च्या अकाउंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की, बंदूक मी आणून देतो भाऊ तुला, पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर.’

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा पहिला धक्का; नांदेडमधील काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश )

गुन्हे अन्वेषण विभागाकडून आरोपीला अटक
मुंबई पोलिसांनी ‘X’वर ही पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करत आरोपीचा जीमेल आयडीशी जोडलेला आयपी अॅड्रेस आणि त्याचा मोबाईल नंबर तसेच त्याचे लोकेशन शोधून काढले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात आरोपी शुभम वरकडला शोधून त्याला अटक केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.