भाजप नेते किरीट सोमय्या यांना व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने सोमय्या यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल वर मेल पाठवून ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात एका वृत्तवाहिनीच्या संपादकावर काही आठवड्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वृत्तवाहिनीवर सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना २४ सप्टेंबर रोजी सोमय्या यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ई मेल वर ‘[email protected]’ या ईमेल पत्त्यावरून एक मेल आला. या मेल मध्ये किरीट सोमय्या यांना धमकी देण्यात आली असून त्यांचे कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५०लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांनी दिलं स्पष्टीकरण)
‘तुमच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल कोणत्याही कपड्यांशिवाय माझ्याकडे तुमचे स्पष्ट व्हिडिओ आहेत. यापूर्वी लिक झालेला व्हिडीओ हा केवळ ट्रेलर होता, वास्तविक चित्रपट अद्याप बाकी आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून, तुम्हाला ५०लाख रुपये द्यावे लागतील, पर्याय तुम्ही निवडू शकतात, तुम्ही मेल ला प्रतिसाद दिला नाही तर हे व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल’ या आशयाची धमकी ईमेलवर देण्यात आली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी रविवारी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community