नाशिक (Nashik) येथील पाथर्डी फाटा परिसरातून दोन महिला आणि २२ वर्षीय युवक अशा तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांना सदनिका उपलब्ध करणाऱ्या जाधव नामक व्यक्तीलाही अटक करण्यात आली. नाशिक येथे उपजीविकेसाठी ते दोन महिन्यांपूर्वी शहरात आले. संशयित महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करत होत्या. संशयित महिला ज्या ब्युटी पार्लरमध्ये काम करीत होत्या, त्या संचालकाशी चौकशी केली जाणार आहे, असे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक शरमाळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जाणार आहे. (Nashik)
(हेही वाचा- Senior Section Engineer Railway Salary : रेल्वेतील विभागीय अभियंता काय काम करतो, त्याचा पगार किती?)
बांगलादेशातील अस्थिरतेमुळे ते्थून भारतात घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशातच ही बाब समोर आल्यामुळे त्यास एक प्रकारे पुष्टी मिळत आहे. तीन बांगलादेशी नागरिक पाथर्डी गाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाच्या कारवाईत दोन महिलांसह २२ वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले. दिंडोरी येथील जाधव नामक व्यक्तीने त्यांना मदत केली. पाथर्डी गाव परिसरात सदनिका उपलब्ध करीत करारनामा करून दिला. एटीएस पथकाने या संशयितांना इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (Nashik)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community