सोशल मीडियावर चाईल्ड प्रोनोग्राफीचे पेव फुटले आहे. विविध फेक आयडीवरून फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर चाईल्ड प्रोनोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात येत असल्याची चिंताजनक बाब सायबर सेलच्या तपासात समोर आली आहे. सायबर सेलने ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात चाईल्ड प्रोनोग्राफी प्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
स्मार्टफोन हा लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत प्रत्येकांच्या हातात दिसतो. प्रत्येक जण फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडियाचा वापर करीत आहे. सध्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रोनोग्राफीचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून पैसे कमविण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. अश्लील व्हिडीओमुळे वयात येणारे तरुण, लहान मुलांवर परिणाम होत आहे. प्रोनोग्राफी व्हिडीओमध्ये चाईल्ड प्रोनोग्राफीला सोशल मीडियावर अधिक मागणी असल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर स्वतःचे बनावट आयडी तयार करून अश्लील चित्रफीत, चाईल्ड प्रोनोग्राफीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात अपलोड केले जात आहे.
(हेही वाचा – बॉडी बिल्डर संकल्प भाटकरकडून आई वडिलांवर जीवघेणा हल्ला: आईचा मृत्यू, वडील चिंताजनक)
महाराष्ट्र सायबर विभाग आणि मुंबई सायबर विभागाच्या तपासात फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफर्मवर चाईल्ड प्रोनोग्राफीचे व्हिडीओ अपलोड केले जात असल्याचे लक्षात येताच सायबर विभागाने याची गंभीर दखल घेत, चाईल्ड प्रोनोग्राफी सोशल मीडियावर अपलोड करणारे बनावट आयडीचे आयपी अड्रेस शोधून काढत ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल केले आहे.
एका गुन्ह्यात राणावत शेखावत नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा गुन्हा अभिषेक कलगुडे आणि तिसरा गुन्हा अवतार सिंग आचरावर दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर चाईल्ड प्रोनोग्राफीचे व्हिडीओ अपलोड केल्याचे सायबर सेलच्या तपासात समोर आले आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या या तिघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community