Bangladeshi Infiltrators यांना भारतात येण्यासाठी तीन मार्ग; तिन्ही मार्गाचे समोर आले रेटकार्ड

52
Bangladeshi Infiltrators यांना भारतात येण्यासाठी तीन मार्ग; तिन्ही मार्गाचे समोर आले रेटकार्ड
  • प्रतिनिधी 

मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवड्यात घाटकोपर पोलिसांनी १३ आणि गुन्हे शाखेने सात अशा एकूण २० घुसखोर बांगलादेशीयांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारतात आणून त्यांची राहण्याची आणि नोकरीची सोय करण्यासाठी किती रक्कम देण्यात आली होती याचा रेटकार्ड काही बांगलादेशी नागरिकांनी पोलिसांना दिला. (Bangladeshi Infiltrators)

घाटकोपर पोलिस आणि गुन्हे शाखेने मिळून गेल्या आठवड्यात अटक केलेल्या २० बांगलादेशी नागरिकांमध्ये १३ महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या एका बांगलादेशी नागरिकाकडे भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी एजंटना दिलेल्या रकमेची माहिती देणारे ‘रेटकार्ड’ सापडले आहे. रेडकार्डमध्ये २ हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत रेट लावण्यात आले आहे. सर्वात धोकादायक मार्गांसाठी प्रति व्यक्ती २ हजार रुपयांचा दर आहे आणि सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मार्गांसाठी प्रति व्यक्तीला १५ हजार रुपये मोजावे लागतात. (Bangladeshi Infiltrators)

मुंबई गुन्हे शाखा युनिट १ ने मोहम्मद इद्रिस शेख उर्फ ​​जोशीमुद्दीन बिशू दिवाण या बांगलादेशी नागरिकाला अटक केली असून तो १९९४ पासून मुंबईत राहत होता. ही अटक चर्नी रोड स्थानकाजवळ करण्यात आली. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना एक ‘रेटकार्ड’ सापडले. ज्यामध्ये बांगलादेशी नागरिकांनी भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी एजंटना किती रक्कम दिली होती. गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, बांगलादेशी नागरिक सामान्यत: मालदा, २४ परगणा, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, उत्तराखंडमधील दिनेशपूर आणि चापई नवाबगंज (बांगलादेश) यांसारख्या प्रदेशांमधून भारतात प्रवेश करतात. त्यांना भारतात आणण्यासाठी वेगवेगळे चोरटे मार्ग अवलंबले जातात. (Bangladeshi Infiltrators)

(हेही वाचा – BMC Hospitals & Dispensary : महापालिकेची अडवणूक करणाऱ्या ‘या’ कंपनीला टाकणार काळ्या यादीत?)

जलमार्ग 

पाण्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रति व्यक्तीस २ ते ४ हजार घेतले जातात. हा मार्ग असुरक्षित असून या मार्गात मगरी आणि बंगाली वाघांचा वावर असल्यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक समजला जातो. या मार्गातून भारतात प्रवेश करणे म्हणजे एक प्रकारे मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणे असे समजले जाते. हा मार्ग अत्यंत आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि ज्याला कुटुंबाचे पोट भरायचे आहे असा व्यक्तीच या मार्गाची निवड करतो अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. (Bangladeshi Infiltrators)

डोंगराळ मार्ग 

डोंगराळ मार्ग हा मार्ग तसा सुरक्षित असला तरी या मार्गावर असलेल्या मोठे मोठे डोंगर पार करून सीमेच्या पलीकडे जाता येते. या मार्गावर मोठी दमछाक आणि लांब पल्ला गाठावा लागतो या मार्गाचा दर ७ ते ८ हजार रुपये आहे. (Bangladeshi Infiltrators)

सपाट जमीन मार्ग

हा मार्ग सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हा मार्ग सर्वात महाग आहे, या मार्गासाठी घुसखोर बांगलादेशी एजंटना १२ हजार ते १५ हजार रुपयांची रक्कम मोजतात. हे एजंट अनेकदा बांगलादेश रायफल्सच्या सदस्यांशी संगनमत करून सीमा ओलांडणे सुलभ करतात. हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे जिथे एजंटांच्या मदतीने सीमा ओलांडल्या जातात, अनेकदा बीएसएफच्या लक्षात येत नाही. काही प्रकरणांमध्ये, आर्थिक देवाणघेवाण होते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या रेटकार्ड शिवाय घुसखोर बांगलादेशीकडून नोकरी, राहण्याची सोय आणि त्यांना भारतात राहण्यासाठी भारतीय असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून देण्यासाठी वेगळी रक्कम घेतली जात होती. (Bangladeshi Infiltrators)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.