धक्कादायक! तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

three year old girl was sexually assaulted and killed in bhiwandi
धक्कादायक! तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

भिवंडीतील शांतीनगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

माहितीनुसार, मुलीचे वडील हे भंगार विक्रेते असून आई रोजंदारीवर काम करते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी मुलीला घरी ठेवून कामाला निघून गेले होते. पण दुपारी घरी येताच मुलगी कुठे दिसलीच नाही. त्यामुळे आई-वडीलांनी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले. मग त्यांच्या तक्रारीच्या आधाराने शांतीनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

बुधवारी सकाळी एका पडलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर मुलीचा मृतदेह आढळला असून तिचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – दौंड हादरले! आत्महत्या की घातपात? भीमा नदीत आढळले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here