Online Fraud : सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशही ‘बनावट’; बड्या उद्योगपतीला सात कोटींचा गंडा

गुप्त बँक खात्यात सात कोटी रुपये जमा करण्याचे बनावट सरन्यायाधीशाचे निर्देश

66
AI निर्मित छायाचित्र

सायबर गुन्हेगारांच्या (Cyber ​​Crime) टोळीने गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवत एका बड्या उद्योगपतीला फसवले आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत सायबर गुन्हेगारांनी बोगस आभासी न्यायदालन (Fake Virtual Courtroom) ही तयार केले होते. या टोळीने प्रसिद्ध कापड उद्योगपती व वर्धमान समूहाचे चेअरमन एस.पी.ओसवाल (S.P. Oswal) यांच्यावर जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित आर्थिक घोटाळा प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला. ज्या ऑनलाईन फ्रॅडला (Online Fraud)ला ओसवाल बळी पडले.

( हेही वाचा : BMC : महापालिकेत सहायक आयुक्तांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभाराचा बोजा

ओसवाल यांच्यावर आधारकार्डचा दुरुपयोग करून बनावट पासपोर्ट व डेबिट कार्डसह मलेशियामध्ये पार्सल पाठवणे आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. याचाच आधारे सायबर गुन्हेगारांच्या टोळीने गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत. स्काइप कॉलद्वारे (Online Fraud) सर्वोच्च न्यायालयाची बोगस सुनावणी केली. विशेष म्हणजे यामध्ये असे भासवण्यात आले की, जसे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड (Dhananjaya Chandrachud) या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. मात्र हा सर्व प्रकार बोगस असल्याचे नंतर लक्षात आले.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या नावे बनावट मेसेज ही ओसवाल यांच्या व्हॉट्सअॅपवर (Online Fraud) पाठवण्यात आला. ज्यात गुप्त बँक खात्यात सात कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यात या बोगस खटल्यावर ओसवाल यांनी विश्वास ठेवून सात कोटी रुपये भरले. त्यानंतर ओसवाल यांच्या कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने या खटल्यात गडबड असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५.२५ कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे ओसवाल यांच्या बँक खात्यात वळवण्यात आले आहेत. यात आंतरराज्यीय सायबर गुन्हेगार असल्याचे लक्षात आले असून गुवाहाटीमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.