Harassment In Mumbai : मालकाच्या छळाला कंटाळून बोटीसह तिघांचे भारतात पलायन

विजय विनोद अँटोनी (२९), निदिसो डिटो (३१) आणि जे. सहाया अँटोनी अनिश जैनश (२९) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांचा मालक अब्दुल्ला मोहम्मद अब्दुल रहमान अल सरहिद याने बळजबरीने त्यांचे पासपोर्ट काढून घेतल्यानंतर आणि त्यांना दोन वर्षे पगार न देता त्यांचा छळ करीत असल्यामुळे हे तिघे कुवेतमधून पळून आले अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली.

294
Harassment In Mumbai : मालकाच्या छळाला कंटाळून बोटीसह तिघांचे भारतात पलायन

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याची आठवण करून देणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अरबी समुद्रात मुंबई किनाऱ्याकडे वेगाने येणाऱ्या एका संशयित विदेशी मासेमारी बोटीला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गस्ती नौकांनी अडवले. बोटीवर अब्दुला सराफत लिहिलेले असल्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि पोलिसांनी ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथे आणून बोटीत असणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या चौकशीत हे तिघे संशयित दहशतवादी नसून कुवैत येथून मालकाच्या तावडीतून सुटून बोटीसह भारतात पळून आले असून हे तिघे तामिळनाडू राज्यात राहणारे असल्याचे समोर आले. (Harassment In Mumbai)

विजय विनोद अँटोनी (२९), निदिसो डिटो (३१) आणि जे. सहाया अँटोनी अनिश जैनश (२९) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांचा मालक अब्दुल्ला मोहम्मद अब्दुल रहमान अल सरहिद याने बळजबरीने त्यांचे पासपोर्ट काढून घेतल्यानंतर आणि त्यांना दोन वर्षे पगार न देता त्यांचा छळ (Harassment) करीत असल्यामुळे हे तिघे कुवेतमधून पळून आले अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना त्यांच्या मालकाकडून वाईट वागणूक आणि मारहाण करण्यात आली, त्याचा छळ (Harassment) आणि अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी कुवेतमधून पळून जाण्याची योजना आखली. कुवेत सोडल्यानंतर दहा दिवसांनी सौदी, कतार आणि दुबईच्या सीमा पार करून तिघांनी जीपीएस नेव्हिगेशन वापरून मुंबई गाठली. (Harassment In Mumbai)

(हेही वाचा – Hockey Player Accused of Rape : अर्जुन पुरस्कार विजेत्या वरुण कुमारवर बलात्काराचा आरोप)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “आम्ही बोटीवरील ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा मच्छिमारांची चौकशी केली आणि त्यांनी त्यांची दिलेली माहिती तामिळनाडू पोलिसांकडे पडताळली असता तेथील पोलिसांनी त्याची पुष्टी केली, पुढील तपास सुरू आहे,” असे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि तटीय पोलिसांचे संयुक्त पथक मुंबई पोलिसांमध्ये (Mumbai Police) सामील होऊन तीन भारतीय कर्मचाऱ्यांची अधिक चौकशी करेल आणि ताब्यात घेतलेल्या मासेमारी जहाजाची तपासणी करतील असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Harassment In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.