भाईंदरजवळील उत्तन कोस्टल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा हुक्का परिसरात निकोटीन आणि तंबाखूयुक्त पदार्थ विक्री होत असल्याप्रकरणी तेथील एका रेस्टॉरंट आणि बारवर छापा टाकला. उत्तन येथील डोंगरी परिसरात असलेल्या ‘हॉटेल मिड टाऊन’वर ही कारवाई करण्यात आली. बार-कम-हुक्का जॉइंटचे मालक सिमरजीत सिंग चड्ढा आणि वेटर जोगेंद्र साव यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने यांची बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर मराठे यांच्या सूचनेनुसार रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांनी बारवर छापा टाकून हुक्क्याचे पाईप, भांडी व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. बार-कम-हुक्का जॉइंटचा मालक सिमरजीत सिंग चड्ढा यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. छापेमारीदरम्यान ६ ग्राहकांनाही अटक करण्यात आली. हर्बल तंबाखूमुक्त हुक्का देण्याच्या नावाखाली शहरात सुरू असलेल्या अनेक बेकायदेशीर जॉइंट्स आणि बारचे अड्ड्यांमध्ये रूपांतर झाले आहे.
Join Our WhatsApp Community