Toll Booth Protest : टोलनाका आंदोलन, ३ गुन्हे दाखल, १३जणांना अटक 

नवघर पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलन कर्त्यांना मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती

131
Toll Booth Protest : टोलनाका आंदोलन, ३ गुन्हे दाखल, १३जणांना अटक 
Toll Booth Protest : टोलनाका आंदोलन, ३ गुन्हे दाखल, १३जणांना अटक 
टोलनाका आंदोलन (Toll Booth Protest) प्रकरणी मुलुंड नवघर पोलिसांनी ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह १३ मनसैनिकांना ताब्यात घेवून दंगलीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्याना अटक करण्यात आली आहे.
दुपारी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुलुंड पूर्व येथील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी दाखल होत आंदोलन सुरू केले, दरम्यान नवी मुंबईतील मनसैनिकांनी ऐरोली टोलनाका येथे आंदोलन (Toll Booth Protest) सुरू केले. घटनास्थळी दाखल झालेल्या  नवघर पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि इतर आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नवघर पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एकाने पेटता टायर आनंदनगर टोलनाक्याच्या कॅबिन मध्ये टाकून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केला, दरम्यान पोलिसांनी तात्काळ आग विझवून पेटता टायर टाकणाऱ्याला ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
तसेच ऐरोली टोल नाका या ठिकाणी आंदोलन (Toll Booth Protest) करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात आणून  मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह आंदोलन कर्त्याविरुद्ध आंदोलन आणि दंगलीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान पेटता टायर टाकून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनाचे पडसाद नवी मुंबईतील वाशी टोलनाका येथे उमटले असून वाशी टोल नाका या ठिकाणी मनसैनिकांनी टोल बंद आंदोलन केल्याची माहिती समोर आली. नवघर पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलन कर्त्यांना मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.

हेही पहा- https://www.youtube.com/watch?v=eXlc_u07rgg

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.