बहुचर्चित शेकडो कोटींचा टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने अटकेत असलेल्या ८आरोपी विरुद्ध २७ हजार १४७ पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात सोमवारी दाखल केले आहे. या आरोपपत्रात ८ अटक आरोपी आणि ११ फरार आरोपी दाखविण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण घोटाळा १४५.५८ कोटींचा असून त्यात १४ हजार १५७ जणांची फसवणूक झाली असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी अटक केल्यापासून ६९ दिवसांच्या तपासानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, तानिया उर्फ तजगुल कासाटोवा, व्हॅलेंटिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तौसिफ रियाझ, आर्मेन अटियन आणि लल्लन सिंग (Lalan Singh) अशी अटक करण्यात आलेल्या नावे असल्याचे आरोपपत्रात म्हटले असून फरार ११ आरोपींपैकी आठ युक्रेनियन, दोन भारतीय आणि एक तुर्की नागरिक असल्याची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात टोरेसचा भंडाफोड झाला होता. टोरेस कंपनीच्या दादर (Dadar) येथील मुख्य कार्यालयात गुंतवणूकदारांची रीघ लागली होती. (Torres Scam)
(हेही वाचा – Maharashtra Legislative council elections: अपक्ष अर्ज बाद होणार?)
या फसवणुकी प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता, आणि तिघांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या फसवणुकीची व्याप्ती बघून मुंबई तसेच आजूबाजूच्या शहरात दाखल झालेले टोरेसचे गुन्हे एकत्र करून गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी तयार करण्यात आली होती.
एसआयटीने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, तानिया उर्फ तजगुल कासाटोवा, व्हॅलेंटिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तौसिफ रियाझ, आर्मेन अटियन आणि लल्लन सिंग अशी अटक करण्यात आली आहे. फरार ११ आरोपींपैकी आठ युक्रेनियन, दोन भारतीय आणि एक तुर्की नागरिक आहे. आरोपपत्रात नमूद करण्यात आले की,या घोटाळ्यात १४,१५७ जणांची फसवणूक झाली आहे, आतापर्यंतच्या तपासात १४२.५८ कोटीचा हा घोटाळा झाला आहे. (Torres Scam)
(हेही वाचा – Pakistan चे सैन्य हादरले; सामूहिक राजीनामे देण्याचे सत्र सुरु)
या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने २८० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये घोटाळा उघड करणारे सीए अभिषेक गुप्ता (Abhishek Gupta) यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची साक्ष आहे. आरोपपत्रानुसार, आरोपी लल्लन सिंग (Lalan Singh) विविध वित्तीय संस्थांद्वारे काळा पैसा पांढरा करण्यासाठी जबाबदार होता. तपासात असे दिसून आले आहे की १३.७८ कोटी रुपयांचा मनी लाँडरिंग झाले आहे, नंतर हा पैसा मुंबईत टोरेस ज्वेलरीच्या कारवाया स्थापित करण्यासाठी वापरण्यात आला होता. (Torres Scam)
आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी, आर्थिक गुन्हे शाखेने अनियमित ठेव योजनांवर बंदी घालणारा कायदा लागू केला, ज्यामुळे अधिकाऱ्यांना मालमत्ता परत करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी घेण्याची परवानगी मिळाली. रोख रक्कम आणि फर्निचरसह जप्त केलेल्या ३२ कोटी किमतीच्या मालमत्तेचा लवकरच लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारे पैसे पीडितांमध्ये वाटले जातील. (Torres Scam)
आरोपपत्रानुसार, सुरुवातीची रोख गुंतवणूक टोरेस कंपनीच्या खात्यात हस्तांतरित करण्यापूर्वी विविध वित्तीय संस्थांमध्ये जमा करण्यात आली होती. हे पैसे प्रामुख्याने टोरेस ज्वेलरीच्या कामकाजासाठी निधी देण्यासाठी वापरले जात होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगींशी जोडलेल्या अनेक बँक खात्यांची देखील तपासणी केली आहे, ज्यामुळे संशयास्पद व्यवहार आणि इतर वित्तीय संस्थांशी संबंध उघड झाले आहेत. अधिकारी फरार आरोपींच्या ठिकाणाची चौकशी करत आहेत आणि येत्या आठवड्यात पुढील कारवाई अपेक्षित आहे. (Torres Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community