Torres Scam : टोरेस कंपनीने ‘लकी ड्रॉ’ मध्ये दिलेल्या कार पोलिस जप्त करणार

62
Torres Scam : टोरेस कंपनीने 'लकी ड्रॉ' मध्ये दिलेल्या कार पोलिस जप्त करणार
Torres Scam : टोरेस कंपनीने 'लकी ड्रॉ' मध्ये दिलेल्या कार पोलिस जप्त करणार
  • प्रतिनिधी

टोरेस कंपनीने ‘लकी ड्रॉ’ मध्ये गुंतवणूकदारांना दिलेल्या कार आणि बक्षीस स्वरूपात दिलेल्या वस्तू आर्थिक गुन्हे शाखा जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने टोरेसच्या कार्यालयातून जप्त केलेले डायमंड (हिरे) हे अंधेरी पूर्वेतील औद्योगिक कंपनीतील हिरे व्यवसायिक यांच्याकडून तसेच जयपूर येथील व्यावसायिकाकडून खरेदी केले होते. या व्यावसायिकांचा आर्थिक गुन्हे शाखा जबाब नोंदवून घेणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. (Torres Scam)

(हेही वाचा – Kannauj Railway Station : उत्तरप्रदेशातील रेल्वे स्थानकात कोसळला पूल; २५ कामगार ढिगाऱ्याखाली दबले)

टोरेस कंपनीच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाला वेग आला आहे. टोरेस कंपनीने सव्वा लाख गुंतवणूकदारांना जवळपास एक हजार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आणल्या होत्या. त्यापैकी ‘लकी ड्रॉ’ मध्ये टोयोटा कंपनीच्या तसेच मारुती सुझुकी कंपनीच्या कार ‘लकी ड्रॉ’ मध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. त्याचबरोबर मोठ्या गुंतवणूकदारांना आयफोन वाटले होते. (Torres Scam)

(हेही वाचा – BEST Bus : बेस्टची बस थेट चहाच्या टपरीवर

टोरेस कंपनीकडून घेण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये १५ गुंतवणूकदारांना मोटारी लागल्या होत्या. त्या मोटारी गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच या कंपनीने आणखी पाच कार बुक केलेल्या होत्या. तसेच शोरूम मध्ये एक कार अशा एकूण २१ कार आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात येणार आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात येणाऱ्या मोटारी न्यायालयाच्या परवानगीने विकून त्यातून मिळणारी रक्कम तसेच जप्त करण्यात आलेली रोकड अशा एकत्र करून त्यातून गुंतवणूकदारांना थोड्या फार रकमा परत करण्यात येणार असल्याचे माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. (Torres Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.