Torres Scam : टोरेसच्या गुंतवणूकदारांची रक्कम हवाला मार्फत विदेशात पाठवली, हवाला ऑपरेटरला अटक

165
Torres Scam : २७ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
Torres Scam : २७ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल
टोरेस ज्वेलरी पॉन्झी योजनेत हजारो गुंतवणूकदा रांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी चर्नी रोड येथून एका हवाला ऑपरेटरला अटक केली. युक्रेनियन आरोपीनी या हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हवाला मार्फत विदेशात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. (Torres Scam)
टॉरेस ब्रँडच्या मागे असलेल्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचने नेमणूक केलेल्या  चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक गुप्ता यांनी आरोप केला आहे की आरोपींनी गेल्या तीन महिन्यांत भारताबाहेर किमान २०० कोटी हस्तांतरित केले आहेत. व्हिसलब्लोअर असल्याचा दावा करणाऱ्या गुप्ता यांनी याआधी तपास यंत्रणांना या फसवणुकीबाबत सतर्क केले होते. (Torres Scam)
अटक करण्यात आलेला हवाला ऑपरेटर अल्पेश खारा (५४) याच्यावर बेकायदेशीररीत्या पैसे हवाला मार्फत विदेशात पाठविल्याचा आरोप आहे. खारा हा हवाला ऑपरेटर आहे जो चौकशी दरम्यान असहकार्य करीत आहे. त्याने युक्रेनियन नागरिकांसोबतच्या त्याच्या व्यवहाराच्या नोंदीही नष्ट केल्या आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “इतर आरोपीनी खाराला ओळखले आहे, त्याने अनेक ठिकाणी पैसे हवाला मार्फत व्यवहार हाताळले. खाराला २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.हवाला ऑपरेटर, ज्याला हवालादार म्हणूनही ओळखले जाते, ही अशी व्यक्ती आहे जी हवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनौपचारिक प्रणालीद्वारे पैशांचे हस्तांतरण सुलभ करते. हवाला ही पैसे हस्तांतरित करण्याची एक प्राचीन पद्धत आहे जी पारंपारिक बँकिंग चॅनेलच्या बाहेर चालते, गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनुसार, आरोपींनी मोठ्या रकमेची मनी लाँडरिंग केली, सुरुवातीला त्यांचा व्यवसाय स्थापित करण्यासाठी हवाला चॅनेलद्वारे भारतात रोख आणली. नंतर, त्यांनी USDT (एक क्रिप्टोकरन्सी) द्वारे गेल्या तीन महिन्यांत २०० कोटींसह फसवणूक केलेली रक्कम देशाबाहेर हस्तांतरित केली . (Torres Scam)
आर्थिक गुन्हे शाखेने  ६.७४ कोटी किमतीची रोकड आणि ४.८३ कोटी किमतीचे दागिने जप्त केले आहेत, आतापर्यंत जप्त करण्यात आलेली रक्कम १५.८४  कोटी झाली आहे. “आम्हाला आतापर्यंत ५,२८९  तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात सुमारे ८४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगीतले आहे. प्रथम खबरी अहवालानुसार (एफआयआर) मध्ये असे दिसून आले आहे की टोरेस ज्वेलरीने मुंबईत सहा दुकाने चालवली आणि अमेरिकन हिऱ्यांमधील गुंतवणुकीवर ६ टक्के साप्ताहिक परतावा देण्याचे आश्वासन देऊन अंदाजे सव्वा लाख गुंतवणूकदारांना फसवले. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासावरून असे दिसून आले आहे की कंपनी वैध रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) परवान्याशिवाय काम करत होती आणि बेनामी मालमत्तांच्या खरेदीसह मनी लाँड्रिंग गुंतलेली होती. (Torres Scam)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.