Torres Scam : ६ महिन्याच्या पर्यटक व्हिसावर आलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी लुटले हजार कोटी

91
Torres Scam : ६ महिन्याच्या पर्यटक व्हिसावर आलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी लुटले हजार कोटी
Torres Scam : ६ महिन्याच्या पर्यटक व्हिसावर आलेल्या युक्रेनच्या नागरिकांनी लुटले हजार कोटी

युक्रेन देशातील नागरिक आर्टेम, ओलेना आणि व्हिक्टोरिया हे तिघे टोरेस कंपनीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. हे तिघे युक्रेनमधून भारतात ६ महिन्यांच्या पर्यटक व्हिसावर आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हे तीनही आरोपी डिसेंबर महिन्यात युक्रेनला पळून गेले असल्याचा संशय आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी मोहम्मद तौसीफ रियाझ जो जॉन कार्टर म्हणूनही ओळखला जातो, त्याने या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याने या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेले युक्रेन नागरिकांना मुंबईत घोटाळ्यासाठी जागा मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Torres Scam)

(हेही वाचा- National Youth Day : स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?)

टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, जनरल मॅनेजर तानिया आणि स्टोर्स मॅनेजर व्हॅलेंटिना कुमार या तिघांना अटक केली आहे. हे तिघे १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी सर्वेश सुर्वे डोंगरीच्या उमरखाडी येथे रहाणारा असून तो आधारकार्ड ऑपरेटर होता. तानिया ही उझबेकिस्तान देशाची नागरिक असून कुलाबा येथे भाड्याने रहाण्यास होती, तर व्हॅलेंटिना कुमार ही मूळची रशियन असून तिने गणेश कुमार या भारतीय नागरिकसोबत विवाह करून भारतात स्थायिक झाली होती. ती सध्या डोंबविली येथे रहात होती. (Torres Scam)

या गुन्ह्यात आर्टेम, ओलेना, व्हिक्टोरिया या युक्रेनच्या नागरिकांसह मोहम्मद तौफिक उर्फ जॉन कार्टर यांच्यासह ७ जणांना आरोपी दाखविले गेले असून तिघांना अटक करण्यात आली असून ४ जण फरार आहे. फरार आरोपी तौसीफ रियाझने टोरेस घोटाळ्याचे कामकाज सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने उघड केले आहे की, मोहम्मद तौसीफ रियाझ ज्याला जॉन कार्टर म्हणूनही ओळखले जाते. त्याने मुंबईतील दादर परिसरात टोरेस पोंझी योजना सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तपास पथकाच्या म्हणण्यानुसार तौसीफने या घोटाळ्यातील सूत्रधार ओलेना आणि आर्टेम यांना कार्यालयाची जागा मिळवून स्थानिक गुप्तचर माहिती पुरवून आणि कंपनीच्या सुरुवातीच्या कामकाजाची स्थापना करण्यासाठी मदत केली. (Torres Scam)

(हेही वाचा- Kumbhavade : कोकणात प्रथमच महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांचा शोध)

तौफिकने केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून फेब्रुवारी २०२४ मध्ये दादर येथे सुरू झालेल्या टोरेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पद तौफिकला देण्यात आले होते. विरारचा रहिवासी आणि दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तौसीफ हा टोरेस कंपनीत येण्यापूर्वी आधारकार्ड एजंट म्हणून काम करत होता. त्याने दादरमध्ये २५ लाख रुपये मासिक भाड्याने ११,५०० चौरस फूट कार्यालयाची व्यवस्था टोरेस कंपनीला करून केली होती. दादर शोरूमची जागा मेहता नावाच्या व्यक्तीच्या मालकीची आहे. सीईओ म्हणून भूमिका असूनही तौसीफला दरमहा ४६ हजार पगार मिळत होता. टोरेसचे संचालक सर्वेश सुर्वेला तौफिक घेऊन आला होता. सर्वेशला संचालक म्हणून टोरेसमध्ये दरमहा ४६ हजार पगार मिळत होता, अशी माहिती समोर आली आहे. (Torres Scam)

सव्वा लाख गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर आणि भरघोस परतावा परत देण्याच्या नावाखाली टोरेस कंपनीने एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. टोरेस कंपनीचे मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे मुख्य कार्यालय आणि शो-रूम आहे, तर लोअर परळ आणि ऑपेरा हाऊस येथे कॉर्पोरेट ऑफिस आहे. (Torres Scam)

(हेही वाचा- मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत रस्ते अपघातांवर नियंत्रण अशक्य; Nitin Gadkari यांची खंत)

आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकला, ज्या ठिकाणी ओलेना युक्रेनमधून तिच्या भेटी दरम्यान वारंवार राहत होती. हा छापा जवळजवळ अडीच दिवस चालला आणि त्यात ९ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली. ज्यामध्ये ५ कोटी रुपये रोख, सोने, चांदी आणि मोइसनाइट दगड यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आर्थिक गुन्हे शाखेने टोरेसची मूळ कंपनी प्लॅटिनम हार्न प्रायव्हेट लिमिटेड, एक प्रेषक आणि आणखी एक संबंधित व्यवसायाशी जोडलेली तीन बँक खाती गोठवली आहेत. EOW ने आरोपी तानिया कुमारच्या कुलाबा निवासस्थानातून ७७ लाख रोख रक्कम देखील जप्त केली आहे. (Torres Scam)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.