Transfer of IPS : राज्यातील वरिष्ठ पोलिसांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलीस अकादमीचे (नाशिक) संचालक राजेश कुमार यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे.

196

गृह विभागाने मंगळवारी, २५ एप्रिल रोजी चार आयपीएस अधिकाऱ्यांना Transfer of IPS अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी पदोन्नती दिली. यासोबतच पाच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस अकादमीचे (नाशिक) संचालक राजेश कुमार यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. छत्रपती संभाजी नगरच्या पोलीस आयुक्तपदावरून प्रतीक्षा यादीत पाठवण्यात आलेल्या IPS निखिल गुप्ता यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांना अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नवीन नियुक्ती मिळाली आहे. IPS सुरेश कुमार मेकला यांना अपर पोलीस महासंचालक आणि नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच राजकुमार विटकर आणि IPS कृष्णा प्रकाश यांनाही अपर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कृष्ण प्रकाश हे फोर्स वनची जबाबदारी सांभाळतील. विटकर हे प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर कायम राहतील.

(हेही वाचा Kidnap : फिल्मी स्टाईलने हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण; १२ तासांत ७ जणांना अटक)

अनुप कुमार सिंह यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी IPS अनुप कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सक्सेना यांची अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र सिंघल यांची बदली करून त्यांना महामार्ग सुरक्षा विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सुखविंदर सिंग यांना अपर पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर पाठवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.