Trees Poisoning Case : जाहिरात कंपनीला रेल्वेकडून ‘ना हरकत पत्र’, मात्र गुन्हेगार सापडत नाही

पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या रेल्वे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ अशा जवळपास २० झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता.

199
Trees Poisoning Case : जाहिरात कंपनीला रेल्वेकडून 'ना हरकत पत्र', मात्र गुन्हेगार सापडत नाही

घाटकोपर येथे झाडांवर झालेल्या विषप्रयोग प्रकरणात (Trees Poisoning Case) एका जाहिरात होर्डिंग कंपनीचे नाव पुढे येत आहे. या घटनेला महिना उलटत आला तरी देखील तपास यंत्रणांकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. हे प्रकरण रेल्वेच्या अंगावर लोटून स्वतःचे अंग या प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. तर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास कासवगतीने सुरू आहे. (Trees Poisoning Case)

पूर्व द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या रेल्वे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ अशा जवळपास २० झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता. या विषप्रयोगामुळे ही झाडे पूर्णपणे मृत झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नालापर्यंत दुभाजकावर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या एन विभागाकडून पंतनगर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. (Trees Poisoning Case)

ज्या ठिकाणी झाडांवर विषप्रयोग करण्यात आला, घटना घडली तो परिसर रेल्वे विभागाकडे येतो, त्या ठिकाणी नुकताच नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे. या पेट्रोल पंपासमोरच असलेल्या सर्व्हिस रोडला खेटून ही झाडे होती. या झाडांना ड्रिल मशीनने छिद्रे पाडून त्यात विषारी द्रव्य टाकण्यात आले होते. हळूहळू ही झाडे संपूर्ण पणे वाळून मृत झाली. सूत्राच्या म्हणण्यानुसार जाहिरात कंपनीला या ठिकाणी जाहिरातीचे होर्डिंग लावायची होती, या झाडांमुळे जाहिरातीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे जाहिरात होर्डिंग कंपनीकडून हे कृत्य करण्यात आले असावे अशी शक्यता वर्तवली गेली. (Trees Poisoning Case)

(हेही वाचा – Ghatkopar : वृक्षांच्या मुळावर उठलंय कोण? ४५ वृक्षांवर विषप्रयोग)

गुन्ह्याचा तपास सुरू

मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे असे म्हणणे आहे की, आम्ही होर्डिंगसाठी परवाना दिला नव्हता. अंतर्गत चौकशी दरम्यान या प्रकरणाचा शोध घेतल्यानंतर आम्हाला कळले की एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मूळत: रेल्वेने दिलेली होती. आम्ही आता या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली आहे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही नियमानुसार या प्रकरणाची चौकशी करू. आत्तापर्यंत, आम्हाला कोणत्याही जाहिरात होर्डिंगसाठी परवाने निलंबित करण्याबाबत कोणतेही पत्र मिळालेले नाही”. (Trees Poisoning Case)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास सुरू आहे, झाडांना विष देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर असलेले सर्व कॅमेरा फुटेज तपासले आहे, मात्र त्यात काहीही आढळून आलेले नाही, पंत नगर पोलिसांनी पेट्रोल पंपावरील कामगारांसह जवळपास काम करणाऱ्या किंवा राहणाऱ्या २० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत आहेत. (Trees Poisoning Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.