Trident Hotel Woman Dead : मुंबईतील अलिशान हॅाटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

96
Trident Hotel Woman Dead : मुंबईतील अलिशान हॅाटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Trident Hotel Woman Dead : मुंबईतील अलिशान हॅाटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबईतील मरीन ड्राईव्ह (Marine Drive) भागात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel Woman Dead) एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विनती मेहतानी (Vinati Mehtani) (६०) असं मयत महिलेचं नाव आहे. महिला २७ व्या मजल्यावरील रुममध्ये मृतावस्थेत आढळली.

हेही वाचा-अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी Donald Trump यांचं तिसर्‍या महायुद्धाबद्दल मोठं विधान

बराच काळ प्रतिसाद देत नसल्याने मास्टर की वापरुन दरवाजा उघडला असता, हा प्रकार समोर आला. महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु आहे. (Trident Hotel Woman Dead)

हेही वाचा-Bet Dwarka येथील रुक्मिणीमाता मंदिर परिसरातील ७ अवैध मशि‍दींवर सरकारने चालवला बुलडोझर

६ जानेवारीपासून ही महिला एकटीच राहत होती. प्राथमिकदृष्ट्या संशयास्पद असे काहीच नसल्याचे पोलिसांनी म्हटले. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Trident Hotel Woman Dead)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.