सध्या टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे. याविषयावर तर्क वितर्क लढवले जात असतानाच आता तुनिषाच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. त्यामध्ये तुनीषाची आई हिने आरोपी झीशानवर गंभीर आरोप केले आहे. त्याने तिला वापरले असे तिच्या आईने म्हटले आहे.
काय म्हणाली तुनिषाची आई?
शीझानने तुनिषाला धोका दिला. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला. लग्नाचे वचन देऊन तिच्यासोबत ब्रेकअप केले. दुसऱ्या मुलीसोबत असतानाही त्याने तुनिषासोबत संबंंध ठेवले. तिचा वापर केला. मला एवढेच म्हणायचे आहे की, शीझानला शिक्षा झाली पाहिजे. मी माझी मुलगी गमावली आहे. मीडियाही खूप सपोर्ट करत आहे त्यांंचही धन्यवाद.
(हेही वाचा मुख्यमंत्री नवस फेडण्यासाठी दिल्लीला जातात; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल)
काय आहे प्रकरण?
शीझान आणि तुनिषा काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तुनिषाच्या मृत्यूआधी काही दिवस त्यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे अभिनेत्री तणावात होती. याच तणावातून अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही कुठलीही बळजबरी झाल्याची चिन्ह दिसत नाही. पोलीस याप्रकरणी आणखी माहितीचा शोध घेत आहेत. तुनिषा शर्माने 2013 मध्ये प्रीमियर झालेल्या भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या चित्रपटातील भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही शोमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, तिने फितूर, बार बार देखो आणि कहानी 2 या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हे प्रकरण लव्ह जिहादचे
भाजप नेते गिरिश महाजन यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणे वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.
Join Our WhatsApp Community