दादरमध्ये १० कोटींच्या एमडी Drugs सह दोघांना अटक

147
दादरमध्ये १० कोटींच्या एमडी Drugs सह दोघांना अटक
  • प्रतिनिधी 

मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दया नायक यांच्या पथकाकडून दादरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये छापा टाकून १०.०८ कोटी रुपये किंमत असलेला एमडी या अमली पदार्थासह (Drugs) दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघे गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहणारे आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरून ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – आग्र्यावरून सुटकेचा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा)

गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दया नायक आणि त्यांच्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून या ड्रग्ज (Drugs) विक्रेत्याकडे एमडी या अमली पदार्थाची (Drugs) मागणी करण्यात आली. हे अमली पदार्थ (Drugs) दादर येथील एका हॉटेलमध्ये मागविण्यात आले होते. गुन्हे शाखेने दादर पूर्व येथील समर लँड गेस्ट हाऊस या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एक खोली बुक केली होती. बुधवारी रात्री ड्रग्ज (Drugs) विक्रेते हे ड्रग्जची डिलीव्हरी घेऊन गेस्ट हाऊसच्या खोलीवर येताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एमडी या ड्रग्जसह दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १०.०८ कोटींचा एमडी हा ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आला.

(हेही वाचा – BMC : मुंबईत महापालिकेच्या २ हजार ४८४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ‘नमस्ते’)

सेनुल जुलुम शेख (२८), जगनकीर शाह आलम शेख (२९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहणारे आहेत. मागील काही महिन्यापासून हे दोघे अमली पदार्थ (Drugs)पोचवण्याचे काम करीत होते. अमली पदार्थ (Drugs) विक्रीचे हे मोठे रॅकेट असून या रॅकेटचा सूत्रधार फरार झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.