दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. (Pune Crime)
पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला येणार असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने विमानतळावर सापळा लावला. विमानतळावर महिला साथीदारासह उतरली. (Pune Crime)
(हेही वाचा : Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण)
गडबडीत महिला आणि तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरुन चौकशी सुरू केली. त्यांची तपासणी करण्यात आली. सहा किलो ९१२ सोन्याची भुकटी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. दोघांकडून सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community