अकोल्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घरी जात असताना अल्पवयीन मुलींसोबत हा प्रकार धक्कादायक घडला आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : पालघरमधील आदिवासी महिलांचा माय होम इंडिया-अवर नॉर्थ ईस्ट पुरस्काराने सन्मान! )
शीतपेयातून दिले गुंगीचे औषध
शुक्रवारी रात्री १५ आणि १७ वर्षीय मुली मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी वाटेत त्यांना ओळखीचा तरुण भेटला, या तरुणाने त्यांना घरी सोडतो असे सांगून एका ठिकाणी नेले. त्यानंतर चॉकलेट आणि शीतपेयातून गुंगीचे औषध दिले गेले. चौघांनी सामुहिक अत्याचार केल्याची माहिती या मुलींनी पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणी सिव्हिलियन पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असून यात आणखी ६ ते ७ जणांचा समावेश असण्याची आहे, सध्या अधिक तपास सुरू असल्याची माहिती अकोला सिव्हिलियन पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community