चुनाभट्टी गोळीबार प्रकरणात (Chunabhatti Firing) हल्लेखोरांना आर्थिक मदत करून त्यांना पळून जाण्यासाठी मोटारसायकली देणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका ज्वेलर्ससह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या ६ झाली असून यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. चार हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात (Indiscriminate firing) स्थानिक गुंड सुमित येरूनकर (Sumit Yerunkar) हा ठार झाला होता तर त्याचे चार साथीदार आणि एक आठ वर्षाची मुलगी जखमी झाली होती. (Chunabhatti Firing)
सानिध्य देसाई आणि प्रभाकर पंचिब्रे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात आरोपींची संख्या ६ झाली आहे. सानिध्य देसाई हा नवी मुंबई (Navi Mumbai) येथील ज्वेलर्स असून कळंबोली येथे त्याचे ज्वेलरीचे दुकान आहे. सायन चुनाभट्टी येथील आझाद गल्ली या ठिकाणी असलेल्या श्री फोटो स्टुडिओ या ठिकाणी रविवारी दुपारी चार हल्लेखोरांनी स्थानिक गुंड सुमित येरूनकर (Sumit Yerunkar) याच्यावर बेछूट गोळीबार केला होता. या गोळीबारात सुमित येरूनकर (Sumit Yerunkar) हा जागीच ठार झाला होता, तसेच त्याचे चार सहकारी आणि आझाद गल्ली येथे राहणारी आठ वर्षाची मुलगी त्रिशा शर्मा ही जखमी झाली होती. या गोळीबार प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांनी (Chunabhatti Police) ४ हल्लेखोरांना अटक केली होती. (Chunabhatti Firing)
(हेही वाचा – Ayodhya : श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनाआधी योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)
सनील उर्फ सन्नी पाटील, सागर सावंत, नरेश उर्फ नऱ्या पाटील आणि आशुतोष गावण असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे होती. हा हल्ला बांधकाम विकासक यांच्याकडून मिळणाऱ्या कामाच्या कंत्राटे तसेच वर्चस्वाच्या लढाईतून करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. हल्लेखोरांना आश्रय देऊन पळून जाण्यासाठी त्यांना मोटारसायकल पुरवणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) ज्वेलर्स सानिध्य देसाई आणि घटनास्थळाची रेकी करून सुमितची खबर देणारा प्रभाकर पंचिब्रे या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना ५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Chunabhatti Firing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community